खालील हिंदी कवितेच नारायण सुर्वे यांनी मराठीत भाषांतर केले आहे. ही कविता ऎकण्यासाठी http://www.youtube.com/watch?v=S6DJPoiXIB8
येथे click करा.
हंबरुन वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय,
दिसती माझी माय.. रे हंबरुन वासराले...
आया बाया सांगत होत्या होतो जव्हा तान्हा, दुष्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा
पिठामंदी, पिठा...मंदी, पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय....
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. रे हंबरुन वासराले...
कण्या काट्या येचायाला माय जायी रानी, पायात नसे वाहन तिच्या फ़िरे आनवानी
काट्या कुट्या... र काट्या.... कुट्या, काट्या कुट्या लाही तिच मानत नसे पाय...
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. रे हंबरुन वासराले...
बाप माझा रोज लावी मायेच्या मागं टुंबण, बास झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम
अग शिकून शानं, शिकून... शानं, शिकून शानं कुठ मोठा मास्तरं होनार हाय......,
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. रे हंबरुन वासराले...
दारू पिऊन मायेला मारी जवा माझा बाप, थरं थरं कापे अनं लागे तिले धापं
कसायाच्या, कसा....याच्या, कसायाच्या दावनिला बांधली जशी गाय........,
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. रे हंबरुन वासराले...
बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पानी, सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल रानी
भरल्या डोळ्यांन, भरल्या..... डोळ्यांन, भरल्या डोळ्यांन कवा पाहिल दुधावरची साय......
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. रे हंबरुन वासराले...
म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी, पुन्हा एकदा जनमं घ्यावा माये तुझ्य़ा पोटी.
तूझ्य़ा चरणी, तूझ्य़ा....... चरणी, तूझ्य़ा चरणी ठेवून माथा धरावं तुझ पाय........
तवा मले पायामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. रे हंबरुन वासराले...
